शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कामे महापालिकेकडून यशस्वीरित्या पूर्ण - महापौर मंजुषा नागपुरे
Apr 28 2026
57
शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कामे महापालिकेकडून यशस्वीरित्या पूर्ण - महापौर मंजुषा नागपुरे
पिंपरी, ता. २८ - ''पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तांत्रिक कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खडकवासला धरणाचे ३००० मिमी क्षमतेचे व्हॉल्व्ह आणि वारजे जलवाहिनीचे निकामी व्हॉल्व्ह बदलले आहेत. ही कामे पूर्ण झाल्यामुळे आता भविष्यात एखाद्या दुरुस्तीसाठी संपूर्ण पुणे शहराचे पाणी बंद करण्याची वेळ येणार नाही, तर फक्त संबंधित भागापुरती दुरुस्ती करणे शक्य होईल.'', अशी माहिती पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे.
नागपुरे यांनी सांगितले की, ''पर्वती आणि भामा-आसखेड जलकेंद्रांवर आपण नवीन वॉटर मीटर्स बसवले आहेत. यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब कुठे जातोय आणि गळती कुठे होतेय, याचा अचूक हिशोब आपल्याला लागणार आहे. ४५ पेक्षा जास्त तांत्रिक कामे आज युद्धपातळीवर पूर्ण झाली आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व पंपिंग स्टेशन्स सुरु करण्यात आली आहेत. ''
शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि अखंड पाणीपुरवठ्यासाठी अशी नियोजित कामे करणे गरजेचे होते. पुणेकरांनी प्रशासनाला सहकार्य केले, त्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे, अशा शब्दात त्यांनी नागरीकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.