रहाटणी परिसरात १९ वर्षीय युवकाकडून मॅफेड्रोन पावडकर जप्त

रहाटणी परिसरात १९ वर्षीय युवकाकडून मॅफेड्रोन पावडकर जप्त

रहाटणी परिसरात १९ वर्षीय युवकाकडून मॅफेड्रोन पावडकर जप्त 

पिंपरी, ता. २४ – रहाटणी परिसरात एका तरुणाकडून एम.डी. सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई काळेवाडी पोलिसांनी मंगळवारी (ता. २३) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २३) कोकणे चौकातील चितळे बंधू स्वीट मार्टसमोर ही कारवाई करण्यात आली. आरोपी अथर्व दिलीप फडके (वय १९, रा. पोलीस कॉलनी, रहाटणी) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीदरम्यान १.९२ ग्रॅम फिकट पांढऱ्या रंगाची एम.डी. सदृश्य पावडर आणि ५० रुपये रोख रक्कम असा एकूण १६,८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद ज्ञानदेव कदम यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories