news
clock
रामनवमीनिमित्त गुरुवारी देशभरातील बॅंका बंद

रामनवमीनिमित्त गुरुवारी देशभरातील बॅंका बंद

रामनवमीनिमित्त गुरुवारी देशभरातील बॅंका बंद

पुणे, ता. २५ -  देशभरात गुरुवारी (ता. २६) रामनवमी उत्सव साजरा होत आहे. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या कॅलेंडरनुसार उद्या बँकाना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. त्यामुळे देशभरातील उद्या बँका बंद राहणार आहेत.

रामनवमी देशभरातील सर्व बँक बंद असल्या तरी ऑनलाइन बँकिंग, नेटबँकिंग, UPI अॅप्स, तसेच NEFT आणि RTGS सेवा सामान्यप्रमाणे चालू राहतील. तसेच ATM सेवाही कार्यरत राहील. कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरन्ससारखी बँकेतील प्रत्यक्ष कामे या दिवशी होणार नाहीत, असे प्रशासनाने कळवले आहे.

रामनवमी झाल्यानंतर, मार्च महिन्यात 28 मार्चला  चौथा शनिवार, 29 मार्च रविवार आणि 31 मार्चला महावीर जयंती असल्याने बँका बंद राहतील.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories