रावेतमध्ये सोनसाखळी चोरणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, दोघांचे ६ गुन्हे उघड,  रावेत पोलिसांची कामगिरी

रावेतमध्ये सोनसाखळी चोरणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, दोघांचे ६ गुन्हे उघड, रावेत पोलिसांची कामगिरी

रावेतमध्ये सोनसाखळी चोरणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, दोघांचे ६ गुन्हे उघड,  रावेत पोलिसांची कामगिरी 

पिंपरी, ता. १८ - रावेत परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या दोघांचा पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला. त्यांनी केलेले  ५ जबरी चोरीचे व १ मोटार सायकल चोरी असे एकूण ६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. मुख्य आरोपी आदित्य परशुराम मनलोर (वय १९ वर्षे, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वी अशाच प्रकारचे मोबाईल्स स्नॅचिंग व चैन स्नॅचिंगचे एकूण ६ गुन्हे दाखल आहे.

२ जून २०२६ रोजी रावेत रावेत पोलिस ठाण्यात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी कविता मिलिंद केसरकर (वय ५५ वर्षे) या पती सोबत पायी वॉकिंग करत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने नव्यम कस्ट्रक्शन साईट जवळ, सार्वजनिक रस्त्यावर कविता यांच्या गळयातील मिनी गंठण जबरीने खेचूने नेले होते. 

या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना रावेत पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळ परिसरांतील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली व तांत्रिक विश्लेषण केले. गुप्त बातमीदारामार्फत आरोपीपर्यंत पोहचून गुन्हयातील आरोपींना शोधून काढले  व त्यांना अटक केली. अटक आरोपींची नावे आदित्य परशुराम मनलोर (वय १८ वर्षे, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) त्याचा साथीदार फिदा मनुआली इराणी (वय ३५ वर्षे, रा.पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी आहेत. आरोपींनी रावेत परिसरातील २ व्यक्तींचे चैन स्नॅचींग केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून हिंजवडी, तळेगाव दाभाडे,  विश्रांतवाडी व बिदर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्हेही उघड झाले आहेत. 

अटक आरोपीकडून दोन चैन स्नॅचिंग गुन्हयातील एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच मोटार सायकल चोरी गुन्हयातील मोटार सायकलची किंमत १ लाख रुपये असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कामगिरी तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदिप देशमुख, तपास पथक प्रमुख पोलिस उप-निरीक्षक राहुल खिळे, सहाय्यक पोलिस फौजदार संतोष कोळगे, पोलीस हवालदार १०७१ आशिष बोटके, पोलिस हवालदार १८७२ गोवींद चव्हाण, पोलिस शिपाई १७१२ विनायक मराठे, पोलिस शिपाई २३१३ प्रदीप गायकवाड, पोलिस शिपाई ३०९२ अजित बेंडभर, पोलिस शिपाई २०६५ सौदागर लामतुरे, पोलिस शिपाई ३२५५ विनोद कदम, पोलिस शिपाई ३४४८ निखील कपले यांनी  केली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories