प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप

प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप

 प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप

पिंपरी, ता. १५ - आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न कायम आहे. आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे झाली, तरी सेवा प्रवेश नियम तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जात असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे, असा आरोप मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. १६) आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. 

संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले आहे की, याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहा दिवसांपूर्वी बैठक घेतली आहे. त्याचे इतिवृत देण्यास टाळाटाळ केली जात आहे शासनाने प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावेत. अन्यथा संपाबाबत माघार घेणार नाहीत

आरटीओतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहन परवाने, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची कामे होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. लार्निंग लायसन्स प्रक्रिया सुरू राहू शकते, मात्र कार्यालयीन कामकाज बंद राहणार आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories