news
clock
सव्वालाखांहून अधिक आरसी बुक आरटीओ कार्यालयात पडून

सव्वालाखांहून अधिक आरसी बुक आरटीओ कार्यालयात पडून

सव्वालाखांहून अधिक आरसी बुक आरटीओ कार्यालयात पडून

आपापली आरसी बुक ३० दिवसांत घेऊन जाण्याचे वाहनमालकांना आवाहन  

पिंपरी, ता. २३ -  सुमारे सव्वालाखांपेक्षा जास्त वाहन नोंदणी प्रमाणपत्रे (आरसी बुक) पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पडून आहेत. ही आरसी बुक पोस्टातून परत आली

आहेत. संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांत ती घेऊन जावीत. अन्यथा ३० एप्रिलनंतर राहिलेली सर्व आरसी बुक रद्द केली जातील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी स्पष्ट केले आहे. 

'आरटीओ'ने सांगितले आहे की, सन २००६ पासून परिवहन विभागाने कागदी आरसी बुक व वाहन परवाना देणे बंद केले. स्मार्ट कार्ड सुरु झाले. या स्मार्ट कार्डचे प्रिंटिंग त्या-त्या प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करुन ते पोस्टामार्फत घरी पाठवले जात होते. पिंपरी-चिंचवड आरटीओअंतर्गत येणारे आरसी स्मार्ट कार्ड छत्रपती संभाजीनगर येथे छपाई होऊन चिंचवड पोस्ट कार्यालयात येते. तेथून शहरातील विविध पोस्टांत वितरित केले जाते. त्यानंतर पोस्टमन नागरिकांच्या घरी जाऊन स्मार्ट कार्ड देतात. 

पत्ता चुकीचा किंवा अर्धवट असल्याने, घराला कुलूप असल्यामुळे पोस्टमन ते परत घेऊन जातात. तेथून ती कार्ड्स आरटीओ कार्यालयात माघारी पाठवली जातात. जानेवारी २०११ पासून मे २०२४ पर्यंत सुमारे दोन लाख आरसी बुक पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात परत आले आहेत. त्यापैकी केवळ ६० ते ७० हजार आरसी वितरित करण्यात आली आहेत. अनेक वर्षे आरसी बुक पडून असल्यामुळे प्रशासनाने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वाहन मालकांनी ३० एप्रिलपर्यंत आरसी बुक नेले नाही तर ते रद्द करण्यात येतील, अशी सूचना आरटीओने यांनी दिली 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories