news
clock
ऑनलाईन फसवणुकीतून १८.४५ लाखांची लूट, सांगवीतील घटना

ऑनलाईन फसवणुकीतून १८.४५ लाखांची लूट, सांगवीतील घटना

ऑनलाईन फसवणुकीतून १८.४५ लाखांची लूट, सांगवीतील घटना 

पिंपरी, ता. २४ - एटीएम कार्ड बंद पडल्याचा बहाणा करुन अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीची तब्बल १८ लाख ४५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका इसमाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुरुष असून त्यांचे एटीएम कार्ड काम करत नसल्याने त्यांनी बँकेशी संपर्क साधला होता. बँकेकडून त्यांना १८००१०२२६३६ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता. मात्र चुकून फिर्यादी यांनी दुसऱ्याच मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित आरोपीने स्वतःला बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून दुसरा मोबाईल क्रमांक दिला.

यानंतर आरोपीने ‘मोनं’ या ॲपच्या माध्यमातून फिर्यादीकडून ओटीपी मागवला आणि “तुमचे एटीएम कार्ड घरी पोहोचेल” असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवरून विविध व्यवहार करत त्यांच्या खात्यातून १८,४५,००० रुपये काढून घेतले.

ही घटना २ जानेवारी २०२५ ते ३ जानेवारी २०२५ दरम्यान घडली असून, याप्रकरणी २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.२३ वाजता सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) आणि भादवि कलम ४२०, ४०६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात मोबाईल व बँक खाताधारक आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories