news
clock
'चला चिऊ वाचवू' अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

'चला चिऊ वाचवू' अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

'चला चिऊ वाचवू' अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

पिंपरी, ता. २४ - पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या 'अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट'तर्फे  जागतिक चिमणी दिनानिमित्त 'चला चिऊ वाचवू अभियान' राबविले. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धांचा बक्षीस समारंभ नुकताच सायन्स पार्क सभागृहात झाला. 

पक्षी अभ्यासक पीयूष सेकसरिया यांचे पक्षी संवर्धनावर व्याख्यान विषयावर व्याख्यान झाले. त्यांच्यासह सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खंपारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार आणि 'अलाईव्ह'चे संस्थापक अध्यक्ष उमेश वाघेला यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्वानंद केसरी आणि चैतन्य राजर्षी यांनी सूत्रसंचालन केले. अलाईव्हचे विश्वस्त राजेंद्र कांबळे आणि डॉ. भालचंद्र पूजारी यांनी संयोजन केले. पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि कल्पकघर आयसर यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला.

 मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत आयोजित कथा स्पर्धेत अनुक्रमे स्वाती आठवले व मीना करंजकर (ज्येष्ठ नागरिक विभागून मराठी), राजेश चौधरी व रागेश्री कुलकर्णी (१९ ते ५९ वयोगट विभागून मराठी), श्वेता सरवटे (हिंदी) आणि आदित्य देव (इंग्रजी) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

इतर पारितोषिक विजेत्यांची नावे - रांगोळी - स्मिता पगडे, उज्ज्वला जेजुरीकर, सान्वी काळे; काव्य स्वाती आठवले, पूनम सिंग, आदिती आठवले, जल्पा दवे

कथा - राजेश चौधरी व रागेश्री कुलकर्णी, अभिजित कोळपे व विक्रम गावंडे, पीतांबर लोहार, प्रशांत पाटील; चित्रकला हेमा धोत्रे, सुधीर कुंभार, वरद गावंड, रिहान साळवे, केतकी काशीद.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories