जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात वृक्षारोपण
पुणे, ता. ५ - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. ५) पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्र व क्रीडा विभागातर्फे बालगंधर्व रंगमंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेते सिद्धार्थ जाधव तसेच पुणे महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी व दुहेरी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमास उपायुक्त (सांस्कृतिक केंद्र व क्रीडा विभाग) डॉ. संतोष टेंगले,महापालिका सहाय्यक आयुक्त (क्रीडा) गोविंद दांगट, प्रशासन अधिकारी (सांस्कृतिक केंद्र) राजेश कामठे, प्रशासन अधिकारी (सांस्कृतिक केंद्र) पांडुरंग लोहकरे तसेच सांस्कृतिक केंद्र विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
"हरित पुणे, समृद्ध पुणे" या संकल्पनेला बळ देत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.