पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७ अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त, पार पडला हृद्य निरोप समारंभ
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७ अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त, पार पडला हृद्य निरोप समारंभ
पिंपरी, ता. १ जुलै २०२६ - जून २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७ पोलिस अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त झाले. पोलिस आयुक्तालयातील 'शिवनेरी हॉल'मध्ये त्यांचा निरोप समारंभ बुधवारी (ता. ३०) पार पडला.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप आयुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या कुटुंबियांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोपटे व भेटवस्तू देऊन सन्मान केला. त्यांना व त्यांचे कुटुंबियांना पुढील आनंदी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे नातेवाईक तसेच इतर पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
सेवानिवृत्त झालेले अधिकारी/अंमलदार असे....
१. सतिश विठ्ठलराव नांदुरकर - सहायक पोलिस आयुक्त / वाहतुक विभाग
२. दिपक रामदास साळुंके - सहायक पोलिस आयुक्त /अभियान
३. शंकर रामभाऊ डामसे - पोलिस निरीक्षक / वाहतुक विभाग
४. शांताराम शिवाजी उभे - श्रेणी पोलिस उपनिरीक्षक / वाहतूक विभाग
५. रामदास बापू नरवडे - श्रेणी पोलिस उपनिरीक्षक / चिंचवड पोलिस स्टेशन
६. उन्मेश अनंत जोशी - सहायक पोलिस उपनिरीक्षक / बिनतारी संदेश विभाग
७. राजू त्रिंबक केदारी - पोलिस हवालदार ब.नं.३१२ / पोलिस मुख्यालय
- सन्मान, Felicitation, शाल श्रीफळ, Shawl and Coconut, स्मृतिचिन्ह, Memento, रोप भेट, Sapling Gift, कुटुंबियांसह सत्कार, Family Felicitation
- निरोप समारंभ, Farewell Ceremony, शिवनेरी हॉल, Shivneri Hall, पोलिस आयुक्त, Police Commissioner
- Pimpri Chinchwad Police Commissionerate
- सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, Retired Police Officers
- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय