news
clock
मोकाट श्वानांबाबतच्या तक्रारींचे निराकरण आता प्रभाग स्तरावर केले जाणार

मोकाट श्वानांबाबतच्या तक्रारींचे निराकरण आता प्रभाग स्तरावर केले जाणार

मोकाट श्वानांबाबतच्या तक्रारींचे निराकरण आता प्रभाग स्तरावर केले जाणार 

महापालिकेडून प्रभाग कार्यालयनिहाय स्वतंत्र आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी, ता. २१ - शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे या मोकाट श्वानांबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिकेने आठ प्रभाग कार्यालयनिहाय स्वतंत्र आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

भटक्या कुत्र्यांबाबतच्या तक्रारींच्या निराकरणाला वेळ लागत असल्याने महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागावर रोष व्यक्त केला जात होता. त्यामुळे आता प्रभाग कार्यालयात स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता श्वानांबाबतच्या तक्रारी प्रभाग स्तरावरच निकाली काढल्या जातील, त्यामुळे नागरिकांनी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीनुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. महापालिकेमार्फत ही सर्व कामे भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येतील, असे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

याबाबत, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले की, ''शहरातील नागरिकांना मोकाट श्वानांसंदर्भात तक्रारी मांडण्यासाठी प्रभाग कार्यालय स्तरावरच सक्षम यंत्रणा उभी केली जात आहे. त्यामुळे तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल.'' 

- तक्रारीसाठी संपर्क क्रमांक...... 

- मदनुरकर इरण्णा - 'अ' प्रभाग ९१३०५८०७५१

- शरद राठोड - 'ब' प्रभाग - ७७७६८१२०९०

- राहुल गुलाले - 'क' प्रभाग - ७९७२६०९२७८ 

- निरज हटवार - 'ड' प्रभाग ७०२०३१४९४३ 

- समीक्षा कुंभार - 'इ' प्रभाग - ९४२१६३२५३८ 

- सुरज शिंदे - 'फ' प्रभाग - ९३७०४४३८१५ 

- सुनील कांबळे - 'ह' प्रभाग - ८८८८४४२०४६

- निशिगंधा कचवे - 'ग' प्रभाग ९२८४८०११७७

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories