news
clock
संत तुकारामनगरमध्ये टपरीधारकांचा सुळसुळाट थांबवा अन्यथा परिसराला 'टपरीनगर' असे नाव द्या

संत तुकारामनगरमध्ये टपरीधारकांचा सुळसुळाट थांबवा अन्यथा परिसराला 'टपरीनगर' असे नाव द्या

संत तुकारामनगरमध्ये टपरीधारकांचा सुळसुळाट थांबवा अन्यथा परिसराला 'टपरीनगर' असे नाव द्या 

नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी  

पिंपरी, ता. २१ -  संत तुकारामनगर (प्रभाग क्रमांक २०) परिसरात टपरीधारकांचा सुळसुळाट झाला आहे.  असा आरोप करत टपरी माफियांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास संत तुकारामनगरचे नाव ‘टपरीनगर’ असे ठेवावे, असेही ननावरे यांनी म्हटले आहे.

जितेंद्र ननावरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत तुकारामनगर, मेट्रो स्टेशन परिसर, वल्लभनगर एसटी स्थानक, वाय.सी.एम. रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय तसेच मंडई परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. टपरी माफियांनी पदपथांवर अतिक्रमण करुन त्या जागा पथारीवाले व फेरीवाल्यांना भाड्याने दिल्या आहेत. या टपऱ्यांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, नागरिकांना चालण्यासाठीही जागा उरलेली नाही,  रुग्णालयांच्या परिसरात अतिक्रमण झाल्याने रुग्णवाहिका वेळेवर पोहोचण्यात अडथळे येत आहेत. 

याशिवाय, टपरीधारकांकडून कचरा व सांडपाणी रस्त्यावर फेकले जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. नागरिकांनी तक्रार केल्यास त्यांना दमदाटी व दबावाला सामोरे जावे लागतेय. प्रशासन कारवाईसाठी गेले असता काही टपरीधारकांकडून राजकीय दबाव आणला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रास सहन करत आहेत. 

त्यामुळे, प्रशासनाने अनधिकृत टपऱ्यांवर तातडीने कारवाई करुन अतिक्रमण हटवावे, वाहतूक सुरळीत करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा, संत तुकारामनगरचे नाव ‘टपरीनगर’ असे ठेवावे, असे ननावरे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories