ताथवडेतील २० हेक्टर जमीन पिंपरी-चिंचवड पोलिस मुख्यालय, परेड ग्राउंडसाठी हस्तांतरण प्रस्तावास मान्यता

पुणे, ता. २३ -  पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सुसज्ज मुख्यालय व परेड ग्राऊंड भविष्यामध्ये ताथवडेमध्ये होणार आहे. पोलिस आयुक्तालय मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मान्यता दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार महेश लांडगे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.  

या संदर्भात गृह विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ताथवडे येथील वळूभाता प्रक्षेत्र येथे ६७ हेक्टर ९४ आर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड व इतर संबंधित कार्यालयांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories