पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.....
पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.....
पिंपरी, ता. २५ - पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस तसेच पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासासाठी दिलेले योगदान अनमोल असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला गेला, त्यांच्या कार्याचे,दूरदृषाटी व व्यापक विचारांचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.