वल्लभनगर एसटी आगाराकडून अष्टविनायक आणि साडेतीन शक्तिपीठ तीर्थयात्रेचे आयोजन

वल्लभनगर एसटी आगाराकडून अष्टविनायक आणि साडेतीन शक्तिपीठ तीर्थयात्रेचे आयोजन

वल्लभनगर एसटी आगाराकडून अष्टविनायक आणि साडेतीन शक्तिपीठ तीर्थयात्रेचे आयोजन

पिंपरी, ता. १ ऑगस्ट  २०२६ - वल्लभनगर एसटी आगाराच्या वतीने ऑगस्टमध्ये अष्टविनायक दर्शन आणि साडेतीन शक्तिपीठ तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ७ व ८ ऑगस्ट या दोन दिवस आणि एका रात्रीच्या अष्टविनायक दर्शन यात्रेत मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर व रांजणगाव या आठही गणपतींचे दर्शन घेता येईल. या यात्रेसाठी प्रौढांसाठी - ३,६२० रुपये, महिला, लहान मुलांसाठी - २,९६० रुपये  आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी - २,३१० असा सवलतीचा दर निश्चित करण्यात आला आहे.

दिनांक २९ व ३० ऑगस्टच्या साडेतीन शक्तिपीठ विशेष या दोन दिवसांच्या यात्रेत कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेता येईल. आदमापूर, जोतिबा, नरसोबाची वाडी, औदुंबर आणि कण्हेरी मठ या पवित्र ठिकाणांनाही भेट दिली जाईल. या सहलीमध्ये प्रौढांसाठी ४,८१० रुपये, महिला व ज्येष्ठांसाठी ४,०१० रुपये आणि अमृत ज्येष्ठांसाठी ३,२१० रुपये तिकीट दर राहील.

या प्रवासासोबतच निवास, चहा-नास्ता, दोन्ही वेळचे जेवण, पिण्याचे पाणी आणि टुर गाइडची सोय एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. भाविकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यात्रेच्या नोंदणीसाठी वल्लभनगर आगाराच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापनाकडून केले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories