आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाकड येथे असंख्य नागरिकांनी केली योगासने
पिंपरी, ता. २२ - आंतरराष्ट्रीय योग दिन वाकड येथे झालेल्या भव्य योग कार्यक्रमात सहभागी होत विविध वयोगटातील नागरिकांनी योगासने केली. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर आणि नगरसेविका श्रुती वाकडकर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती तसेच मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला.
यावेळी बोलताना राम वाकडकर म्हणाले की, ''योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा हा जीवनमार्ग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला असून आज जगातील १९० हून अधिक देश योग दिन साजरा करत आहेत. निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारण्यासाठी योगाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.''
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या श्रुती राम वाकडकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ''धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. योग ही केवळ काही आसनांची मालिका नसून निरोगी, आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याची पद्धत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा.''
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे, योग प्रशिक्षकांचे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
- संयुक्त राष्ट्र योग दिन, United Nations Yoga Day, निरोगी जीवन, Healthy lifestyle, योग आरोग्य, Yoga health,
- योग दिन 2026, Yoga Day 2026
- राम वाकडकर, Ram Wakadkar, श्रुती वाकडकर, Shruti Wakadkar
- , योगासने, Yoga asanas, प्राणायाम, Pranayama
- वाकड योग कार्यक्रम, Wakad yoga event
- आंतरराष्ट्रीय योग दिन, International Yoga Day