news
clock
वाकडमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत युवकाचा मृत्यू

वाकडमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत युवकाचा मृत्यू

वाकडमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत युवकाचा मृत्यू

पिंपरी, ता. २५ - वाकड परिसरात भूमकर चौक पुलावर (मुंबई–बेंगलोर महामार्गावर) भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २४) दुपारी घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण अशोक तळकेरी (वय २४, रा. किरकटवाडी, सिंहगड रोड) यांची टीव्हीएस ज्युपिटर (एमएच १२ पीके ३१५१) ही दुचाकी बंद पडल्याने ते रस्त्याच्या कडेला उभे राहून ती सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांचा भाऊ समीर राजू तळकेरी (वय १८) गाडीला ढकलत होता.

त्यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या टाटा इंद्रा टेम्पो (एमएच ४३ सीक्यू ६९३५) चालक सागर नवनाथ खांडेकर (वय २२, रा. हिंगणे म्हसवड, ता. माण, जि. सातारा) याने निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात समीर तळकेरी गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१, ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकास नोटीस बजावण्यात आली आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories