वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना मदत
वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना मदत
पिंपरी, ता. २३ - वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतनिधीचे वाटप करण्यात आले.
या समारंभाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे आणि प्रा. शिल्पागौरी गणपुले यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी, उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त केले. आर्थिक सहकार्याबद्दल फाउंडेशनचे आभार मानले. प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. वुई टुगेदर फाउंडेशन उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे- सपकाळे खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, सलीम सय्यद,अजित कुलथे, दारासिंह मन्हास, सौरभ शिंदे,श्रीनिवास जोशी, शंकर कुलकर्णी, उल्हास दाते, झाकीर सय्यद, विलास गटने,के रंगराव , उल्हास दाते,अरविंद पाटील, विलास जगताप, बाळासाहेब जगताप, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, जावेद शेख, अनिल शिंदे, धनंजय मांडके, जितेंद्र निखळ, रोहिणी बच्चे, अभिजीत पवार, सोनाली डावरे, अवधूत कुलकर्णी, वासंती काळे, एम के शेख, अनिल पोरे, श्रावणी बच्चे, असावरी बच्चे, स्वानंद कुलकर्णी, रोहित वैद्य, भास्कर पाखले,रवी इंगळे , माधवी कुलकर्णी, उल्हास दाते, श्रीकांत कुलकर्णी,सदाशिव जोशी, हनीफ सय्यद, धनराज गवळी यांनी संयोजन केले.
संस्थेच्या सहसचिव मंगला डोळे-सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र काळे यांनी आभार मानले.