चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून, पतीवर गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून, पतीवर गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून, पतीवर गुन्हा दाखल 

पिंपरी, ता. २९ - चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी (ता. २८) विद्यानगर-चिंचवड येथे घडली आहे. वैशाली नागनाथ कांबळे (वय ३५ वर्षे) असे मृत पत्नीचे नाव आहे. 

याबाबत, मयत वैशाली कांबळे यांच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती नागनाथ दत्तू कांबळे (वय ४५ वर्षे, ड्रायव्हर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. २८) या पतीने पत्नी वैशाली यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांचा गळा दाबून खून केला. ही घटना त्यांच्या राहत्या घरी घडली आहे.  

आरोपी पतीवर पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अद्याप अटक करण्यात आली नाही. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories