नारीशक्ती वंदन विधेयकाबाबत विरोधकांची भूमिका ही ७० कोटी महिलांचा विश्वासघात करणारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नारीशक्ती वंदन विधेयकाबाबत विरोधकांची भूमिका ही ७० कोटी महिलांचा विश्वासघात करणारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षांविरोधात जनमत संघटित करण्यासाठी १ कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणार
पुणे, ता. २० - केंद्र सरकारने मांडलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाविरोधात मतदान केल्याने हे विधेयक नामंजूर झाले. विरोधकांची भूमिका ही ७० कोटी महिलांचा विश्वासघात असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, विरोधकांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे, अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २०) मुबंईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मुख्यमंत्री म्हणाले, ''१७ एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, हा दिवस भारतीय इतिहासातील "वॉटरशेड मोमेंट" ठरेल, अशी अपेक्षा होती. कारण त्या दिवशी महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार होते. सर्व पक्ष याला पाठिंबा देतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने काँग्रेस, टीएमसी, उद्धव ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी विरोधी पक्षांनी या विधेयकाला बहुमत मिळू दिले नाही. विरोधकांची ही भूमिका देशातील सुमारे ७० कोटी महिलांचा विश्वासघात झाला असून या विधेयकाची 'भ्रूणहत्या' करण्यात आली.''
फडणवीस यांनी नारीशक्ती विधेयकाबाबतचा इतिहास सांगितला. अलीकडे मांडण्यात आलेली विधेयके अचानक आलेली नसून, त्यामागे दीर्घकालीन घटनात्मक प्रक्रिया आणि भक्कम पार्श्वभूमी आहे असे त्यांनी सांगितले. नारीशक्ती विधेयक संसदेतील महिलांच्या आरक्षणाबाबत असल्याने या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही सरकारने केले होते.
१ कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या एकत्रित करणार आहोत...
''महिलांच्या अधिकारांची 'भ्रूणहत्या' करणाऱ्या सर्व विरोधी पक्षांविरुद्ध जनमत संघटित करण्यासाठी आम्ही देशभरातील महिला शक्तीचे एकत्रीकरण करण्याचा निर्धार केला असून, या विधेयकाच्या समर्थनार्थ आम्ही महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या एकत्रित करणार आहोत.'' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस