पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार युनूस खतीब व अश्विनी सातव ....पुणे पत्रकार पुरस्काराने सन्मानित
पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार युनूस खतीब व अश्विनी सातव ....पुणे पत्रकार पुरस्काराने सन्मानित
पुणे, ता. २० - कम्युनिटी कनेक्ट आणि PAG FOR DEMOCRACY या संस्थांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारा 'पुणे पत्रकार पुरस्कार' पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार युनूस खतीब व अश्विनी सातव-डोके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा समारंभ पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात पार पडला. लोकायत आणि संविधान जागर समितीचे संस्थापक नीरज जैन, ॲड. अय्युब शेख आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारार्थींमध्ये युनूस खतीब, अश्विनी सातव यांच्यासह ओमकार वाबळे (मुंबई तक), प्राची कुलकर्णी (BBC News Marathi), मुक्ता कदम (मुक्त पत्रकार), प्रतीक्षा जोशी (मुक्त पत्रकार) तसेच कॅथरिन अब्राहम (मुक्त पत्रकार) यांचा समावेश आहे. युनूस खतीब युनूस खतीब हे News One India या माध्यमसमूहामध्ये कार्यरत आहेत. शहरातील नागरीकांचे प्रश्न, प्रशासनातील घडामोडी तसेच विविध सामाजिक विषय सातत्याने जनतेसमोर मांडले आहेत. तसेच अश्विनी सातव यांची शहरातील धडाडीच्या महिला पत्रकार अशी ओळख आहे.
पुरस्कार स्विकारल्यानंतर, ''हा सन्मान लोकांनी पत्रकारितेवर दाखवलेला विश्वास आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. पुढील काळातही सामान्य नागरिकांचे प्रश्न, सत्य आणि समाजहितासाठी पत्रकारिता अधिक जोमाने सुरु ठेवणार आहे. '' अन्य पुरस्कारार्थींनीही मनोगत मांडले. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते नवनीत सिंग गांधी आणि मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते अली भोजानी यांनी संयोजन केले.