निगडीत पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, पतीला अटक

निगडीत पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, पतीला अटक

निगडीत पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, पतीला अटक

पिंपरी, ता. २४ - पतीने पत्नीवर दगडाने वार करुन तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची  घटना निगडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास वेलो कंपनी परिसरात ही घटना घडली. फिर्यादी महिला काम आटोपून घरी जात असताना तिचा पती महादेव जाधव (रा. रावेत) याने तिचा पाठलाग केला.

यावेळी आरोपीने “तू मला सोडून दुसऱ्यासोबत राहतेस, आज तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलला. त्यानंतर महिलेवर झडप घालत तिला खाली पाडून तिच्या डोक्यात पुन्हा पुन्हा दगड घातला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

घटनेनंतर निगडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), १३१ व १५२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories