पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर उभारली जाणार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीची भव्य स्वागत कमान
पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर उभारली जाणार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीची भव्य स्वागत कमान
पुणे, ता. ३० - पुणे महानगरपालिका महापौर कार्यालयात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पक्षनेते बैठकीत प्रभाग क्र. १ मधील कळस (पुणे शहर हद्द प्रारंभ बिंदू) येथे प्रतिवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी कायमस्वरूपी, सुबक व भव्य स्वागत कमान उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, पक्षनेते रामचंद्र आत्माराम कदम, सोपान चव्हाण, नितिन गावडे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त(ई) प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) ओमप्रकाश दिवटे आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.