भूगावमधील हॉटेलमधून  हुक्का फ्लेवर व हुक्का पॉट जप्त, हॉटेल मालकावर कारवाई 

पिंपरी, ता. ३  - हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता गिऱ्हाईकांची गर्दी करुन त्यांना जेवणास व हुक्क्यास एकत्र बसवून व हुक्का पिण्यास देऊन लोकांच्या जिवतास धोका होईल अशी रितीने तंबाखूजन्य व ज्वालाग्राही पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी भूगाव (मुळशी तालुका) येथील डस्क अॅण्ड डाऊन हॉटेलवर बावधन पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये, हुक्का पॉट व फ्लेवरसह एकूण २६००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस भारतीय न्याय संहिता कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस दिली आहे.

ही कारवाई २ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे १२.०५ वाजता करण्यात आली. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये हुक्क्यासाठी स्वतंत्र झोन न ठेवता ग्राहकांना जेवणासोबत हुक्का पिण्यास दिला जात होता. गर्दी करून तंबाखूजन्य व ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करण्यात येत असल्याने नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

या प्रकरणी आकाश सोनार (रा. कोथरुड, पुणे) व सोहराब सलीम खान (रा. भुगांव, ता. मुळशी) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७१, २८७ तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढीस तपास करत आहेत. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance