एमआयडीसी भोसरीमध्ये स्क्रॅप मालाचा अपहार,  दोघांविरुद्ध गुन्हा

एमआयडीसी भोसरीमध्ये स्क्रॅप मालाचा अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

 एमआयडीसी भोसरीमध्ये स्क्रॅप मालाचा अपहार,  दोघांविरुद्ध गुन्हा

पिंपरी, ता. १६ - औद्योगिक कंपनीसाठी पाठविण्यात आलेल्या स्क्रॅप मालापैकी सुमारे ७ मेट्रिक टन मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अस्लम बशीर शेख (वय ४०, रा. दत्तनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास मानिक लाटे (रा. देहूगाव) आणि संतोष लाटे (रा. मोशी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२),३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरस इंडिया लिमिटेड (पेफको फाउंड्री डिव्हिजन), एमआयडीसी भोसरी या कंपनीने कुरुळी (ता. खेड) येथील एस.बी.ए. मेटल अँड स्टील प्रा. लि. कंपनीकडून २०.३८० मेट्रिक टन सीआरसीए स्क्रॅप मागविला होता. सुमारे १० लाख ५८ हजार १२९ रुपये किमतीचा हा माल ट्रक (एमएच १४ बीजे ३४२९) मधून कंपनीकडे पाठविण्यात आला होता.

मात्र, कंपनीत केवळ १३ मेट्रिक टन माल उतरविण्यात आला. उर्वरित ७ मेट्रिक टन, सुमारे ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचा माल कंपनीत न उतरविता त्याचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories