news
clock
दिघी परिसरात अवैध गॅस रिफिलिंग प्रकरण उघड, एकावर गुन्हा दाखल

दिघी परिसरात अवैध गॅस रिफिलिंग प्रकरण उघड, एकावर गुन्हा दाखल

दिघी परिसरात अवैध गॅस रिफिलिंग प्रकरण उघड, एकावर गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २६ -  दिघी परिसरात अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस रिफिलिंग करुन त्याचा विक्रीसाठी केलेला साठा पोलिसांना मंगळवारी (ता. २४) सापडला. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने २८ वर्षीय युवकावर मंगळवारी (ता. २४) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास प्राईड वर्ल्ड सिटी लेबर कॅम्पच्या पार्किंगमध्ये हा प्रकार सुरु होता. आरोपी नारायण शिवाजी जंजाळ (वय २८, रा. लोहगाव, पुणे) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडरमधून नोझलच्या सहाय्याने अवैधरीत्या गॅस काढून इतर सिलेंडरमध्ये भरत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत सुमारे ९,८०० रुपयांचा गॅस साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता ज्वलनशील पदार्थ हाताळल्याने मानवी जीवितास धोका निर्माण झाला होता. 

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories