मोहननगर व निगडी-प्राधिकरणातील खंडीत वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे महापौरांना निवेदन

मोहननगर  व  निगडी-प्राधिकरणातील खंडीत वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे महापौरांना निवेदन

मोहननगर  व  निगडी-प्राधिकरणातील खंडीत वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचे महापौरांना निवेदन 

पिंपरी, ता. २९ जुलै २०२६ - महावितरणच्या नियोजनशून्य व गलथान कारभारामुळे  मोहननगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, विद्यानगर आकुर्डी, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, निगडी, प्राधिकरण, रावेत या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी या प्रश्नी पुन्हा एकदा महापौर रवी लांडगे  व आमदार अमित गोरखे यांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की,  मोहननगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, विद्यानगर आकुर्डी, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, निगडी, प्राधिकरण, रावेत येथे वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होत आहे. वर्क फॉर्म होम काम करणाऱ्या कामगारांची कामे खोळंबत आहेत. 

पिंपरी चिंचवड महापालिका दिवसाड पाणी पुरवठा करत असल्यामुळे ज्या दिवशी पाणी असते नेमके त्याच दिवशी वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते.  रात्रीच्या वेळी पाच-पाच तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे डासांचा उपद्रव होऊन अनेक नागरिकांना, लहान मुलांना डेंग्यू-मलेरियाची लागण होत आहे. रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे चोऱ्या होत आहेत. यापूर्वी याबाबत नागरिकांनी अनेकदा लेखी निवेदने व आंदोलने केली आहेत आणि अनेकदा आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, खंडीत वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नाही. 

मारुती भापकर म्हणाले, ''आमदार अमित गोरखे यांनी बुधवारी (ता. २९) महावितरणच्या व मनपाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक प्राधिकरण-निगडी येथील वीर सावरकर भवन येथे आयोजित केली होती. यावेळी नागरिक व अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यानुसार, एक महिन्यात नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर मी सरकारचा भाग असतानाही आंदोलनकर्त्यांसोबत आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा आमदार अमित गोरखे यांनी दिला आहे. त्यानुसार, नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. ''


नागरिकांच्या मागण्या...

१) वरील परिसरातील सर्व रोहित्रे( ट्रांसफार्मर) सर्वेक्षण करून रोहित्रारावरील भार (लोड) कमी-अधिक करून विभाजन करून योग्य भार ठेवण्यात यावा. यामध्ये नव्याने रोहित्र(ट्रांसफार्मर) आवश्यकता असल्यास ते बसवावेत. तसेच ट्रांसफार्मरच्या व फिडर बॉक्सच्या आजूबाजूला वृक्षवेली गवत वाढू नये योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच सर्व विद्युत रोहित्रे (ट्रांसफार्मर) सुरक्षा भिंत व पत्र्याचे कव्हर टाकून आच्छादित करावे.

२) वरील परिसरात सर्व फिडर बॉक्स व एल टि भूमिगत ३००स्वे.एम.एम.२४०स्के एम.एम. लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनींचे सर्वेक्षण करून सर्व जुन्या वाहिनी काढून नवीन वाहिनी टाकाव्यात.

३) वरील परिसरातील ज्या भागात एम एस ई बी च्या विद्युत पोलवर प्रमाणापेक्षा जास्त विद्युत कनेक्शन आहेत अशा भागात नव्याने पोल टाकण्यात यावेत.

४) आपल्या विभागातील पूर्वीचा समाविष्ट नसलेला ज्यास्त लोकसंख्येचा भाग समाविष्ट केला आहे. मात्र कर्मचारी व शिडी गाडी आहे तेवढेच आहे. त्यामुळे या विभागासाठी कर्मचारी शिडी गाड्याची संख्या वाढवावी. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories