news
clock
परस्परांवर रंगांची उधळण करुन शहरात धुलिवंदन साजरे

परस्परांवर रंगांची उधळण करुन शहरात धुलिवंदन साजरे

परस्परांवर रंगांची उधळण करुन शहरात धुलिवंदन साजरे 

पिंपरी, ता. ३ - सकाळपासूनच एकमेकांना रंग लावून शहरभरात लहान-मोठ्या सर्वांनी बुधवारी (ता. ३)  धुलिवंदनाचा सण मोठ्या आनंदात साजरा केला. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्याने शालेय विद्यार्थी आणि तरुणाई रंगांमध्ये न्हाऊन निघाली.

होळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून धुळवड खेळण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. म्हणूनच पालकांनी आपल्या लहान मुलांना विविध प्रकारच्या पिचकाऱ्या घेऊन दिल्या. या पिचकाऱ्यांनी चिमुरड्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींवर रंगांची बरसात केली. तरुण-तरुणींनी आपल्या मित्रमंडळींसमवेत संगीताच्या तालावर ठेका धरत धुळवड खेळली आणि महिला-पुरुषांनीही आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवली नि धुळवडीच्या रंगात रंगण्याचा मनसोक्त आनंद घेतला. 

शहरातील सोसायटी-चाळी-अतंर्गत रस्त्यांवर रंगांमध्ये रंगलेली माणसं दिसत होती. ज्या कार्यालयांना सुट्टी नव्हती तेथील कर्मचाऱ्यांनी कार्यालयात एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली. 'पीएमपीएमएल'च्या कामगारांनीही परस्परांना थोडासा रंग लावून धुळवडीचा आनंद घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories