news
clock
कार्ला येथे २४ एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा

कार्ला येथे २४ एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा

कार्ला येथे २४ एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा 

श्री एकवीरा देवी-श्री दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे आयोजन 

पिंपरी, ता. २७  - श्री एकवीरा देवी-श्री दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने घेण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा यंदा येत्या २४ एप्रिल रोजी कार्ला (लोणावळा) येथील दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगणात पार पडणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे १४ वे वर्ष असून २१ जोडपी विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रोहिदास हुलावळे यांनी दिली.

श्री एकवीरा देवी-श्री दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास हुलावळे यांची निवड झाली आहे. तसेच सोहळ्याची नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. सोहळा समितीच्या कार्याध्यक्षपदी श्यामराव गायकवाड, कार्यप्रमुख बाळासाहेब उर्फ मारुती येवले, उपाध्यक्षपदी भरत मानकर व किरण राणे, सचिव जयराम आंबेकर, सहसचिव हनुमंत आहेर, खजिनदारपदी विश्वेश आवटी तर सहखजिनदार बाळासाहेब डुबे यांची निवड करण्यात आली. यावेळी सोहळ्याचे संस्थापक भाई भरत मोरे, किरण हुलावळे, जितेंद्र बोत्रे, राजू देवकर उपस्थित होते.

समितीच्या वतीने यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा २४ एप्रिल रोजी कार्ला येथील दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगणात होणार आहे. यंदा २१ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.  सामाजिक बांधिलकी जपून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories