news
clock
ओटास्कीम-निगडी येथे सोसायटीत तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

ओटास्कीम-निगडी येथे सोसायटीत तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

ओटास्कीम-निगडी येथे सोसायटीत तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

पिंपरी, ता. २३ -  निगडी-ओटास्कीम परिसरातील सम्राट हाउसिंग सोसायटीमध्ये रविवारी (ता. २२) मध्यरात्री झालेल्या वादातून तीन मित्रांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहे. पोलिसांनी तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एकाला अटक केली आहे. 

याप्रकरणी निखिल लक्ष्मण सोनवणे (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 

फिर्यादी व त्यांचे मित्र अनिकेत दाडगे आणि अमोल क्षीरसागर हे पार्किंगमध्ये उभे राहून गप्पा मारत असताना आरोपी जयदीप दिलीप लोखंडे (वय २५) याने अनिकेत दाडगे यांचा चष्मा काढून घेतला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात आरोपीने शिवीगाळ केली, तर त्याच्या आईने अनिकेत दाडगे यांचा चष्मा तोडला. तसेच अमोल क्षीरसागर यांनाही मारहाण करण्यात आली.

घटना वाढत असताना फिर्यादीचे आई-वडील वाद सोडवण्यासाठी गेले असता आरोपी जयदीप लोखंडे, त्याचे वडील दिलीप रामचंद्र लोखंडे (वय ५२) आणि एका महिला आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली.

दरम्यान, जयदीप लोखंडे याने घरातून कोयता आणून “तुम्हाला आता खलासच करतो” अशी धमकी देत उपस्थितांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीचे नातेवाईक अनिकेत सोनवणे यांच्या डाव्या मनगटाला, फिर्यादी निखिल सोनवणे यांच्या उजव्या खांद्याला, तसेच अनिकेत दाडगे यांच्या हाताला दुखापत झाली.

घटनेदरम्यान परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले असता आरोपीने हवेत कोयता फिरवत “मध्ये कोणी पडू नका, नाहीतर मारुन टाकेन” अशी धमकी देत दहशत निर्माण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात निगडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), शस्त्र अधिनियम कलम ४/२५, २७ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories