भारतीय हवामान विभागाच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा सतर्क, सर्व विभागांना दक्ष राहण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

भारतीय हवामान विभागाच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा सतर्क, सर्व विभागांना दक्ष राहण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

भारतीय हवामान विभागाच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा सतर्क, सर्व विभागांना दक्ष राहण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - भारतीय हवामान विभागाने आज, शुक्रवारी (ता. ३१) पुणे जिल्ह्यात दिवसभर मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह संबंधित विभागांनी पूर्ण क्षमतेने सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

शहरात पावसाचा जोर वाढल्यास रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे, जलनिस्सारण व्यवस्थेवर ताण येणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. आवश्यकतेनुसार तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवावे. पाणी साचण्याची शक्यता असलेले रस्ते, नाले, पूल, उड्डाणपूल, सखल भाग आणि पूरप्रवण परिसराची सातत्याने पाहणी करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच पावसामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी २४ तास दक्ष राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे.

अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, जलनिस्सारण विभाग, स्थापत्य विभाग तसेच इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद द्यावा. आवश्यक यंत्रसामग्री, पंपिंग मशिन्स, बचाव साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे. पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे, वेगाने वाहणारे पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करणे तसेच धोकादायक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. कोणतीही आपत्कालीन घटना, झाड पडणे, पाणी साचणे किंवा इतर अडचण निर्माण झाल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी अथवा नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन मदत हवी असल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विभागप्रमुखांना हवामान विभागाच्या सूचनांवर सातत्याने लक्ष ठेवून परिस्थितीनुसार त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून नागरिकांना आवश्यक सेवा अखंडितपणे उपलब्ध करून द्याव्यात तसेच उद्भवणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तत्परतेने प्रतिसाद देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यंत्रणांना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना....

''भारतीय हवामान विभागाने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि संबंधित यंत्रणांना २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भाग, पूरप्रवण परिसर, नाले, पूल तसेच संवेदनशील ठिकाणांवर सातत्याने पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महापालिका परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल.'' – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories