news
clock
पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा मिळणार

पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा मिळणार

पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा मिळणार

जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे १५ दिवसांत कार्यवाहीचे आदेश, आमदार शंकर जगताप यांचा पाठपुराव्याला यश

पिंपरी, ता. २६ - पिंपरी-चिंचवड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा उचलण्यास येत्या १५ दिवसांत परवानगी दिली जाईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. आमदार शंकर जगताप यांनी याबाबत माहिती दिली आहे.  

राज्याच्या विधीमंडळ अधिवेशना दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणी प्रश्नावर बुधवारी (ता. २५) महत्त्वाची बैठक पार पडली. आमदार जगताप यांनी या प्रश्नावर आग्रही भूमिका घेत अर्धा तास चर्चा केली. 

यावेळी पवना धरणातून १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणीसाठा उचलण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय भामा आसखेडचे अतिरिक्त पाणी , मावळ तालुक्यातील मौजे-शिरे येथील   ०.९५  हेक्टर जमीन जलसंपदा विभागाकडून कायमस्वरुपी हस्तांतरित करण्याबाबत आदेश दिले आहेत. या सर्व निर्णयामुळे शहरातील नागरिकांना उन्हाळ्यातील पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. 

या बैठकीला कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, मुख्य अभियंता रा. अ. कायलवार, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, नगर विकास विभागाचे अवर सचिव शिवाजी चव्हाण, पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, पाणी पुरवठा सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरदे उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप याबाबत म्हणाले, ''शहरात दरवर्षी ८.३८ टीएमसी पाणी (६५० एमएलडी) वापरले जाते. शहराची आजमीतिला लोकसंख्या ३७ लाखांच्या उंबरठ्यावर आहे. सध्या दिवसाआड पाणी वाटपाचे नियोजन शहरांमध्ये राबवले जाते. त्यामुळे उपलब्ध पाणीपुरवठा संदर्भात जलसंपदा विभागाकडे पवना धरणातून १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शहराची पाण्याची आवश्यकता आणि वितरित होणारा पाणीपुरवठा याच्या तुलनात्मक अभ्यासानंतर जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी पवना धरणातून १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे.''

 शहरवासीयांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार

''पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता, उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा पडत होता. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेत या विषयावर आग्रही भूमिका मांडल्यानंतर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेत पवना धरणातून अतिरिक्त १०० ‘एमएलडी’ पाणी उचलण्यास १५ दिवसांत परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. केवळ पाणी आणणेच नव्हे, तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदी प्रदूषण रोखणे आणि आंद्रा-भामा आसखेडचे हक्काचे पाणी नागरिकांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.''

–  शंकर जगताप, आमदार

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories