news
clock
'पीएमपीएमएल'च्या बैठकीत महापौर रवी लांडगे  शहरवासियांसाठी मांडली ठोस भूमिका

'पीएमपीएमएल'च्या बैठकीत महापौर रवी लांडगे शहरवासियांसाठी मांडली ठोस भूमिका

 'पीएमपीएमएल'च्या बैठकीत महापौर रवी लांडगे  शहरवासियांसाठी मांडली ठोस भूमिका

पिंपरी, ता. २ - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML)संचालक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे उपस्थित होते. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी सेवा सुधारणा, तांत्रिक आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधा वाढविण्याबाबत ठोस भूमिका मांडली.

यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पुणे महानगरपालिका आयुक्त  नवल किशोर राम, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, संचालक व पुणे महापालिकेचे नगरसदस्य अजय खेडेकर तसेच इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी 'पीएमपी'च्या अधिकाऱ्यांनी दोन्ही महापालिकांच्या महापौरांचे व अधिकाऱ्यांचे स्वागत केले. पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असल्याने या बैठकीत पुणे व पिंपरी दोन्ही शहरात 'पीएमपी'ची सेवा अधिक सक्षम कशी करता येईल याबाबत सर्वांनी चर्चा केली. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories