आज मट्रोची सेवा दुपारी ३ नंतर सुरु राहणार 

पिंपरी, ता. ३ - धुलीवंदनानिमित्त मंगळवारी (ता. ३) पुणे मेट्रोची पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सेवा सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.  दुपारी ३ नंतर मात्र मेट्रोची सेवा नियमित वेळापत्रकानुसार पुन्हा सुरु होईल व रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहील, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली.

धुलिवंदनानिमित्त अनेक कार्यालयांना सुट्टी असते. तसेच सगळीकडे सकाळी धुळवड खेळली जाते. त्यामुळे मेट्रोने आपल्या सेवेच्या वेळेत बदल केला आहे. सर्व प्रवाशांना याची नोंद घेऊन आपले प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance