परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

पिंपरी, ता. ३ - ब्राम्हण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट व्याज परतावा योजना मंजूर केल्या आहेत. 

वरील दोन योजनांसाठीचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयात आवश्यक सर्व कागदपत्रांसह स्वसाक्षांकीत करुन महामंडळाच्या कार्यालयास हातपोच व्दारा, पोस्टाव्दारा अथवा कुरीअर व्दारा १५ मार्चपर्यंत पाठविण्यात यावेत, असे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले आहे. 

सदर दोन योजनांची सविस्तर माहिती व शासन निर्णय महामंडळाच्या http://pavm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्याऱ्या ब्राम्हण समाजातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या http://pavm.maharashtra.gov.in या बेवसाईटवर जोडलेल्या विहीत नमुन्यामध्ये अर्ज महामंडळास सादर करायचा आहे. 

- महामंडळाचा पत्ता खालीलप्रमाणे - 

   व्यवस्थापकीय संचालक, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर,     विधानभवन, पुणे ४११००१

-   शहरातील समाजबांधवांनी अधिक माहितीसाठी नंदू उर्फ नितीन भोगले यांच्याशी

  ९९२२९९६८८२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance