भोंदू अशोक खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान'च्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

भोंदू अशोक खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान'च्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

भोंदू अशोक खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान'च्या आर्थिक व्यवहारांची चौकशी 

पुणे, ता. २४ - भोंदू अशोक खरात याच्या मिरगाव येथील 'श्री शिवनिका संस्थान'च्या उत्पन्नात गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल ७४ पटींनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. संस्थाननेच धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातून ही समोर आली. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

श्री शिवनिका संस्थानने धर्मादाय आयुक्तालयाला सादर केलेल्या लेखापरीक्षणानुसार, गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी संस्थानची आर्थिक स्थिती घसरणीची होती. संस्थानचे सन २०१८-१९ पर्यंत सुमारे एक लाख ६० हजार ते एक लाख ६५ हजारांची तूट असताना, सन २०१९-२० मध्ये अचानक संस्थानच्या मालमत्तेमध्ये भरमसाट वाढ झाल्याचे दिसत आहे. सात लाखांवरून थेट एक कोटी ४१ लाखांवर उत्पन्न गेले.

सन २०२४ मध्ये संस्थानला एकाच वर्षात तब्बल ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपयांच्या  देणग्या आल्या आहेत. खरात उच्चभ्रू वर्गातील लोकांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे खडे, चिंचोके मंतरलेले असल्याचे भासवून ते लाखो रुपयांना विकायचा. मिरगावातील त्याच्या श्री ईशान्येश्वर मंदिरात तो पूजाविधीही करायचा. त्या माध्यमातूनही तो लाखो रुपये उकळत होता. हेच पैसे तो संस्थानच्या बँक खात्यावर घेत असे. शिवनिका संस्थानचे अचानक वाढलेले उत्पन्न आणि खरातच्या इतर आर्थिक व्यवहारांचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories