खेळाडूंना मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य रेल्वेतून नेण्यास परवानी

खेळाडूंना मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य रेल्वेतून नेण्यास परवानी

खेळाडूंना मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य रेल्वेतून नेण्यास परवानी

पुणे, ता. २७ - रेल्वेने प्रवास करणाऱ्या खेळाडूंना आता मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य रेल्वेत सोबत नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 

रेल्वे मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, भालाफेकीसाठी वापरला जाणारा भाला तसेच इतर काही मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य मालवाहतूक शुल्क भरून रेल्वेत नेता येणार आहे. अशा साहित्याला ट्रेनच्या लगेज डब्यात प्राधान्याने जागा दिली जाईल. विशेष म्हणजे, या क्रीडा साहित्यावर सामान्य सामानासाठी लागू असलेली वजन मर्यादाही लागू होणार नाही. त्यामुळे खेळाडूंना त्यांचे साहित्य सुरक्षितपणे आणि अधिक सोयीने नेता येणार आहे. मात्र, ही सुविधा सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्याला लागू होणार नाही.

यापूर्वी मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य नेण्यास परवानगी नसल्याने अनेक खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत होता. काही वेळा साहित्य वेगळ्या मार्गाने पाठवावे लागत, कधी कधी अतिरिक्त खर्चही करावा लागत होता. आता नवीन नियमांमुळे खेळाडूंची सोय होणार आहे. मात्र, ही सुविधा सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्याला लागू होणार नाही. पोल व्हॉल्टमध्ये वापरला जाणारा पोल या यादीत समाविष्ट करण्यात आलेला नाही, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.

 रेल्वेने प्रवास करताना पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, फटाके, स्फोटके, दारूगोळा, शस्त्रे किंवा इतर कोणतेही धोकादायक साहित्य सोबत नेण्यास सक्त मनाई आहे. अशा वस्तू आढळल्यास संबंधित प्रवाशावर कायदेशीर कारवाईसह दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories